"गुणवत्तेची अट नाही गुणवत्ता आम्ही निर्माण करू "

About Us

अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल, आष्टा

१५ जून २००२ मध्ये अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल ने आपला प्रवास सुरू केला. अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल हे आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रातील राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा अभ्यासक्रम अंगीकृत असणारी कायम विनाअनुदानित माध्यमिक स्तरातील पहिली आय. एस. ओ. -९००१:२०१५ ने मानांकित शाळा झाली आहे. सांगली जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित माध्यमिक विभाग स्तरावरील पहिली आंतरराष्ट्रीय प्रमाणित शाळा म्हणून मान्यता मिळाली. आमच्या सैनिकी शाळा पद्धतीने चालणाऱ्या माध्यमिक शाळा जिचा विस्तार ५ वी ते दहावी सेमी इंग्रजी व ११ वी , १२ वी विज्ञान (माहिती तंत्रज्ञान विषयासह)झाला आहे.हि शाळा निवासी व अनिवासी असून विद्यार्थ्यांना ने - आण करण्यासाठी अल्प दरात बससेवा उपलब्ध आहेत. उत्तमोत्तम शिक्षणाबरोबरच इतर सुविधा ही दिल्या जातात. आमचा स्टाफ ही याला अतिशय चांगली साथ देत आहे ही गौरवाची बाब आहे. आमच्या विद्यालयाकडे सुसज्ज भव्य इमारत, प्रशस्त वर्ग खोल्या, इ-लर्निंग ची सोय, उत्कृष्ट संगणक कक्ष , सैनिकी पॅटर्नचे प्रशिक्षण, त्याचबरोबर आधुनिक जगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी पुरविल्या जातात. "गुणवत्तेची अट नाही, गुणवत्ता आम्ही निर्माण करू " या ध्येयानुसार आमची वाटचाल सुरु आहे.विविध प्रकारचे सांघिक व वैयक्तिक खेळ यासाठी आवश्यक असणारे तज्ञ राष्ट्रीय खेळाडू यांची प्रशिक्षक म्हणून संस्थेने नेमणूक केली आहे. त्याचबरोबर आवश्यक असणारे प्रशस्त मैदान, त्यावरील सोयी सुविधा यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात करून दिली आहे. इ. ५ वी व ८ वी च्या स्कॉलरशिप, इलेमेंटरी व इंटरमिजिएट,१० वी साठी, S.P.I या परीक्षेसाठी स्वतंत्र कक्षासह तज्ञ मार्गदर्शन व प्रशिक्षित शिक्षकांची सोय उपलब्ध केली आहे.